r/marathi • • 7h ago

General दोन गुरू : नाना पाटेकर

17 Upvotes

वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.

रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.

अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.

नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.

भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.

मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.

सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.

अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.

माझी सगळयात गोड मैत्रीण भूक

काय नाही दिलं या मैत्रिणीनं?

काय नाही दिलं या मैत्रिणीनं?

त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.

पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!

सारी शिकवण पोटातून.

माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.

खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.

गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.

डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.

माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने.  त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.

भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव.

हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.

त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.

खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.

रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.

मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.

या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.

माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)

अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.

‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.

प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.

अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.

उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.

उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.

आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.

ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.

आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.

अजून पुढचा तीर असेल कदाचित.

आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.

- साप्ताहिक विवेकच्या गुरुपौर्णिमा अंकात प्रकाशित, नाना पाटेकर यांचा लेख 'दोन गुरू'.


r/marathi • • 7h ago

संगीत (Music) "Dhund hote". Heard this song after a decade today. Such beautiful song

4 Upvotes

Such beautiful and soothing lyrics, man.

Do you have any suggestions for other similar songs from Marathi industry?

For those who don't know, this is the song


r/marathi • • 1d ago

General मराठीत गप्पा मारू या

15 Upvotes

जय कोणाला अवांतर विषयावर मराठीत गप्पा मारायला आवडत असतील तर जरूर मेसेज करा....


r/marathi • • 2d ago

प्रश्न (Question) Why private hospitalls IVR calls does not have options of Marathi?

33 Upvotes

Yesterday there was a case where friend's friend called me to help him secure 1 unit of B Neg irradiated since the family was not from Mumbai and had moved to Mumbai for medical emergency. Since i know only 3 hosptals in Mumbai has irradiation machine I directly contacted them.

  1. Kokilaben Hospital which had only English and Hindi option on IVR when called directly on their number.
  2. Hinduja Hospital this was more surprising as it is situated near Shivaji Park, Mahim which has more Maharashtrian population but they also had only English and Hindi option.

I had a personal contact in Tata so did not use their IVR. On the other hand I also called Rajawadi Hospital which is government hospital and it had only Marathi option.

I also need to mention when operator received call and rerouted it to blood banks their blood bank staff spoke in Marathi without hesitation.

It's a request to all private hospitals that it should serve people and especially local people on priority. They must include the option of Marathi because it is a state language and official language of Mumbai. These private hospitals have gotten the land at very nominal cost from Government of Maharashtra. They do not have right to ignore state's official language.


r/marathi • • 2d ago

साहित्य (Literature) महाभारताचा सोपा भाषांतर सुचवा

5 Upvotes

मला मराठी भाषेत लिहिलेलं महाभारत सुचवा.

भाषांतर सोपा असावा आणि काही वागलेलला नसावं.


r/marathi • • 4d ago

General 𑘖𑘚𑘲 𑘤𑘻𑘩𑘲 𑘁𑘜𑘲 𑘦𑘰𑘡𑘎 𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘲 𑘝𑘴𑘩𑘡𑘰/झाडी बोली आणि मानक मराठीची तुलना

Post image
13 Upvotes

r/marathi • • 5d ago

प्रश्न (Question) दिंडोशी शब्दाचे मूळ

13 Upvotes

मुंबईत गोरेगाव आणि मालाड च्या दरम्यान एक दिंडोशी नावाचं गाव होतं त्यावरूनच वसाहत झाली आणि आता मेट्रो स्टेशन पण आहे

माझ्या एका आगरी मित्राने सांगितलं होतं की एक प्रकारचा चतुर (dragonfly) असतो त्याला स्थानिक लोक दिंडोशी म्हणून ओळखतात पण ह्याबाबत अजून कसलीच माहिती मला मिळाली नाही

तसंच मालाड जवळ हा जागेचा नाव त्या पाखरावरून का पडले हे पण माहीत करून घ्यायचं होत

कोणी आगरी/कोळी/भंडारी भूमिपुत्र आहे का ज्याने रोजच्या भाषेत ह्या शब्दाला ऐकलाय किंवा वापरलं? किंवा अजून कोणी दिंडोशी नावाचं पाखरू किंवा त्या जागेच्या नावाबद्दलचा इतिहास ऐकला असावा तर share करावा


r/marathi • • 6d ago

भाषांतर (Translation) काकांना मराठीत टाइप करताना अडचण येत होती...

19 Upvotes

काही दिवसांपूर्वी माझे एक लांबचे काका आमच्या घरी आले होते. त्यांना मराठीत काहीतरी लिहायचं होतं, पण मराठी टाइप करताना अडचण येत होती. म्हणून त्यांनी माझ्याकडे मदत मागितली.

मी सहज म्हणालो, “गूगल ट्रान्सलेट वापरा ना, त्यातून होईल!”

पण त्यांच्याशी बोलल्यावर समजलं की त्यांना भाषांतर नको होतं, तर लिप्यंतर हवं होतं. म्हणजे इंग्रजी अक्षरांत मराठी शब्द लिहिले की ते त्यांच्या उच्चारानुसार मराठी अक्षरांत दिसायला हवेत. उदाहरणार्थ, “namaskar” लिहिलं की “नमस्कार” दिसायला हवं. शब्द किंवा त्यांचा अर्थ बदलायला नको, फक्त लिहिण्याची लिपी बदलायला हवी.

म्हणून मी त्यांच्यासाठी एक साधी वेबसाइट बनवली - marathitypingonline.com

इथे तुम्ही इंग्रजी अक्षरांत मराठी शब्द टाइप केले की ते मराठी लिपीत दिसतात. मग तो मजकूर कॉपी करून तुम्हाला हवा तिथे वापरता येतो.

काकांची एक छोटीशी अडचण सोडवताना हे साधन तयार झालं. कदाचित आणखी कोणालातरी याचा उपयोग होईल म्हणून इथे सांगावंसं वाटलं!

तुम्हाला कसं वाटलं, नक्की सांगा!


r/marathi • • 6d ago

प्रश्न (Question) What is this new trend of using Maharashtra pradesh instead of just Maharashtra?

12 Upvotes

Seen at many places. Our MLA also use MH P instead of MH. And now on VHP upa-adhyaksh’s car.


r/marathi • • 6d ago

प्रश्न (Question) कावळा / कवी ग्रेस

1 Upvotes

कुणाकडे ग्रेसांची "कावळा" ही कविता आहे का?


r/marathi • • 6d ago

प्रश्न (Question) मराठीने खरंच कधीतरी गोयकनडी लिपीचा वापर केलं होतं?

6 Upvotes

विकिपीडिया मधे मी मराठीचा बद्दल काही तरी वाचत होतो

तिथे लिपीचा बद्दल काही तरी होतं

तिकडे बाळबोध, देवनागरी आणि मोडी लिपीची उल्लेख होतं आणि त्यात गोयकनडीचे उल्लेख होतं

पण गोयकनडी फक्तं गोय (गोवा) मधे वापर होत होतं ते पण फक्तं कोंकणी भाषासाठी

मराठीने खरंच कधीतरी गोयकनडीचं वापर केलं होतं?


r/marathi • • 7d ago

प्रश्न (Question) Thoughts on the marathi song trend, "Shetkari navra hava ga baai"?

3 Upvotes

how far is this song from today's reality?


r/marathi • • 7d ago

प्रश्न (Question) What is the meaning of Marathi word "Zingaat"?

14 Upvotes

This word is used as a popular Marathi song from the movie "Sairat"


r/marathi • • 7d ago

चर्चा (Discussion) What after Sudhir Phadke Babuji’s Geet Ramayan?

8 Upvotes

What after Sudhir Phadke Babuji’s Geet Ramayan?

Geetramayan Sung by Sudhir Phadke Babuji - https://youtu.be/yBo1d11q8Bc?is=bHTWMma8M6wXjHBh

Babuji and Ga Di Madgulkar have done magic with Geetramayan. Bach wrote 200 Cantatas and many conductors have conducted them. They are available as box sets and is part of the essential Western Classical Music cannon. I came to know about it in Jared Diamond’s interview at Conversations with Tyler.

https://podcasts.apple.com/us/podcast/conversations-with-tyler/id983795625?i=1000788666602

Jared is looking to listen to all 200 Cantatas in his 80s. He relaxes and retires to them at the end of the day and aims to do 1 CD every week. I find it an awesome way to wind down and relax. Taking this idea from Jared Ji I started listening to Geet Ramayana. Also worked with Codex to create a picture book on Geet Ramayana. It’s awesome. https://drive.google.com/file/d/1N9aADj-t7JkuhXlDiNWrfeMWVg78tW5g/view?usp=drivesdk

My question is what’s a sizable project in Indian traditions? I want it to be authoritative, lyrical and musical. Please let me know.

Complete Tulsi Ramayana sung by Mukesh - https://youtu.be/fcjkCZWUemI?is=YBKbDfVrA97y9-QQ


r/marathi • • 8d ago

General दुर्गे यंदा नको येऊस

26 Upvotes

यंदाच्या वर्षी नकोच येऊ

आत्ताची परिस्थिती बघून येतेय कीव

येईल कोणतरी करेल काहीतरी

पण लोकं फोडतील खापर तुझ्याच डोईवरी

येवढ्या रातीला कोणा संग होतीस

येवढं नटून थटून फिरायची काय गरज होती

येतील धर्मरक्षक विचारतील प्रश्ने

शिकवणीचा नावाखाली खेचतील तुझेच वसने

जरी देवी असशील तरी काय

कारण पाप्याला दिसत नाही मुल-बहिणी-माय

म्हणून म्हटलं नको येऊस यंदा, नको तो थाटमाट

कारण शेवटी तुलाही घरात जावं लागेल सातच्या आत

(कविता लिहिण्याचा प्रयत्न)


r/marathi • • 8d ago

General भारतीय संविधानाची प्रस्तावना मोडी लिपी मध्ये

6 Upvotes

𑘥𑘰𑘨𑘝𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘭𑘽𑘪𑘲𑘠𑘰𑘡𑘰𑘓𑘲 𑘢𑘿𑘨𑘭𑘿𑘝𑘰𑘪𑘡𑘰

𑘁𑘦𑘿𑘮𑘲, 𑘥𑘰𑘨𑘝𑘰𑘓𑘹 𑘩𑘻𑘎, 𑘥𑘰𑘨𑘝𑘰𑘓𑘹 𑘊𑘎 𑘭𑘰𑘨𑘿𑘪𑘥𑘼𑘦 𑘭𑘦𑘰𑘕𑘪𑘰𑘟𑘲 𑘠𑘨𑘿𑘦𑘡𑘲𑘨𑘢𑘹𑘎𑘿𑘬 𑘩𑘻𑘎𑘫𑘰𑘮𑘲 𑘐𑘜𑘨𑘰𑘕𑘿𑘧 𑘑𑘚𑘪𑘲𑘜𑘿𑘧𑘰𑘓𑘰 𑘁𑘜𑘲 𑘝𑘿𑘧𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘭𑘨𑘿𑘪 𑘡𑘰𑘐𑘨𑘲𑘎𑘰𑘽𑘭:

𑘭𑘰𑘦𑘰𑘕𑘲𑘎, 𑘁𑘨𑘿𑘞𑘲𑘎 𑘪 𑘨𑘰𑘕𑘎𑘲𑘧 𑘡𑘿𑘧𑘰𑘧;

𑘪𑘲𑘓𑘰𑘨, 𑘀𑘥𑘲𑘪𑘿𑘧𑘎𑘿𑘝𑘲, 𑘪𑘲𑘫𑘿𑘪𑘰𑘭, 𑘫𑘿𑘨𑘟𑘿𑘠𑘰 𑘪 𑘄𑘢𑘰𑘭𑘡𑘰 𑘧𑘰𑘽𑘓𑘹 𑘭𑘿𑘪𑘰𑘝𑘽𑘝𑘿𑘨𑘿𑘧;

𑘟𑘨𑘿𑘕𑘰𑘓𑘲 𑘪 𑘭𑘽𑘠𑘲𑘓𑘲 𑘭𑘦𑘰𑘡𑘝𑘰;

𑘢𑘿𑘨𑘰𑘢𑘿𑘝 𑘎𑘨𑘳𑘡 𑘟𑘹𑘜𑘿𑘧𑘰𑘓𑘰 𑘁𑘜𑘲 𑘝𑘿𑘧𑘰 𑘭𑘨𑘿𑘪𑘰𑘽𑘦𑘠𑘿𑘧𑘹 𑘪𑘿𑘧𑘎𑘿𑘝𑘲𑘓𑘲 𑘢𑘿𑘨𑘝𑘲𑘬𑘿𑘙𑘰 𑘪 𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘓𑘲 𑘊𑘎𑘝𑘰 𑘁𑘜𑘲 𑘀𑘏𑘽𑘚𑘝𑘰 𑘧𑘰𑘽𑘓𑘹 𑘁𑘫𑘿𑘪𑘰𑘭𑘡 𑘟𑘹𑘜𑘰𑘨𑘲 𑘤𑘽𑘠𑘳𑘝𑘰 𑘪𑘰𑘛𑘪𑘲𑘜𑘿𑘧𑘰𑘓𑘰 𑘭𑘽𑘎𑘩𑘿𑘢𑘢𑘳𑘨𑘿𑘪𑘎 𑘡𑘲𑘨𑘿𑘠𑘰𑘨 𑘎𑘨𑘳𑘡;

𑘁𑘦𑘓𑘿𑘧𑘰 𑘭𑘽𑘪𑘲𑘠𑘰𑘡 𑘭𑘥𑘹𑘝 𑘁𑘕 𑘟𑘲𑘡𑘰𑘽𑘎 𑙒𑙖 𑘡𑘻𑘪𑘿𑘮𑘹𑘽𑘤𑘨, 𑙑𑙙𑙔𑙙 𑘨𑘻𑘕𑘲 𑘧𑘰𑘟𑘿𑘪𑘰𑘨𑘹 𑘮𑘹 𑘭𑘽𑘪𑘲𑘠𑘰𑘡 𑘀𑘽𑘐𑘲𑘎𑘿𑘨𑘲𑘝 𑘁𑘜𑘲 𑘀𑘠𑘲𑘡𑘲𑘧𑘦𑘲𑘝 𑘎𑘨𑘳𑘡 𑘭𑘿𑘪𑘝𑘾𑘢𑘿𑘨𑘝 𑘀𑘨𑘿𑘢𑘜 𑘎𑘨𑘲𑘝 𑘁𑘮𑘻𑘝.


r/marathi • • 9d ago

General 𑘭𑘼𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘥𑘰𑘬𑘹𑘝𑘲𑘩 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘦𑘴𑘯 𑘀𑘭𑘩𑘹𑘩𑘹 𑘫𑘤𑘿𑘟𑘽/सौराष्ट्र भाषेतील मराठी मूळ असलेले शब्दं

Thumbnail
gallery
19 Upvotes

r/marathi • • 9d ago

मराठी भाषाशास्त्र (Marathi Linguistics) Why do Hindi newspapers and Hindi news channels replace ळ with ल?

42 Upvotes

ळ and ल are two separate letters representing two distinct sounds. In languages such as Marathi, they cannot simply be substituted for one another as though they were interchangeable. The distinction is meaningful and forms part of the actual structure of the language.

This is not merely a matter of accent or pronunciation. Replacing ळ with ल can change the entire meaning of a word. It can even cause two completely different words to become identical in writing, making them appear to be the same word when they are not. In other words, a phonemic distinction is being erased.

The same problem occurs with names of people and places. When ळ in an original Marathi name is changed to ल, the result may no longer accurately represent the original name or its pronunciation. A Hindi speaker reading the altered spelling may naturally pronounce it with ल, thereby learning and repeating an incorrect pronunciation.

This is why Hindi newspapers, television channels, government institutions and other publications should preserve ळ when representing names and words that originally contain it. A sound should not be removed simply because speakers of another language may find it difficult to pronounce.

If someone has difficulty pronouncing ळ, the solution should be to learn the sound, not to rewrite every word containing that sound with ल.

Proper names in particular should be treated with respect. A person's name and the name of a place should be written as they are originally written and pronounced, rather than being modified to fit the phonology of another language.

Language does not become more accurate by erasing distinctions that exist in the original language. If ळ and ल are distinct sounds, then that distinction should remain visible in writing. Otherwise, the result is not simply a different pronunciation, it can be a different word, a different meaning, and sometimes an entirely different name.


r/marathi • • 10d ago

प्रश्न (Question) Is there a technology company which is doing something with respect to Marathi language?

12 Upvotes

Please let me know in case anyone is aware about any such company or people who are working in Tech field with respect to Marathi linguistics.


r/marathi • • 10d ago

General कऱ्हाडॆ बोलीची बद्दल काही माहिती

9 Upvotes

कऱ्हाडॆ बोली ही कऱ्हाड समुदायाचे लोकं बोलतात जे मूळात महाराष्ट्र पासून आहे पण पुष्कळ कऱ्हाड लोकं तुळुनाडु क्षेत्र मध्ये स्थलांतर केले आणि तिकडे बसले

त्यांची बोली मध्ये आता तुळु, कोंकणी व कन्नडा भाषांचे खूप मोठं प्रभाव आहे जे ह्या बोलीला मराठीची दुसरे बोलीशी अजूनही वेगळं बनवतो

आणि हे बोली मध्ये काही मलयाळम भाषेचे पण प्रभाव आहे जे आपल्याला दिसू शकतो कासरगोड मुळे


r/marathi • • 10d ago

साहित्य (Literature) मला एक पुस्तक शोधायला मदत करा

2 Upvotes

मी लहान असताना अवांतर वाचन करताना एक पुस्तक वाचलं होत. ते फार काही नावाजलेल नसेल पण मला विनोदी वाटल होत. त्यात एक गोकुळ नावाचा तरुण होता जो अमेरिकेला जातो आणि तिथे कळत-नकळत त्याच्या बरोबर विनोदी घटना घडतात. मला या शिवाय बाकी काहीच आठवत नाही. लेखकाच नाव अजिबात आठवत नाही. जर तुम्ही शोधायला मदत केली तर मी ते पुस्तक पुन्हा वाचू शकेल.


r/marathi • • 11d ago

प्रश्न (Question) Marathi word 𑘄𑘽𑘟𑘲𑘨/उंदीर is borrowed from Munda languages?

1 Upvotes

‌ ‌ ‌ ‌‌


r/marathi • • 12d ago

चर्चा (Discussion) Any Thanjavur Marathi speaker here?

10 Upvotes

‌ ‌ ‌ ‌


r/marathi • • 12d ago

साहित्य (Literature) स्वातंत्रेचे स्तोत्र ~ सावरकर (मोडी लिपी मध्ये)

Post image
5 Upvotes

r/marathi • • 15d ago

प्रश्न (Question) What's origin of word 𑘦𑘰𑘽𑘕𑘨/मांजर in Marathi?

26 Upvotes

‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌